मूळ करण सत्ता – संत तुकाराम अभंग – 733

मूळ करण सत्ता – संत तुकाराम अभंग – 733


मूळ करण सत्ता । नाहीं मिळत उचिता ॥१॥
घडे कासयानें सेवा । सांग ब्रम्हांडाच्या जीवा ॥ध्रु.॥
सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥२॥
तुका म्हणे भावें । शरण म्हणवितां बरवें ॥३॥

अर्थ

सर्व जगताचे मूळ स्वरूप म्हणजे निर्गुण स्थिती आहे तेथे देवा तुझी योग्य सेवा करण्यास मिळत नाही.तुझी सेवा कशी घडेल तेवढे हे ब्रम्हांडनायका तू मला सांग?सागरामध्ये दुसरा सागर समावत नसतो तसे आपणही ब्रम्हरूप झाल्यावर कशी सेवा होईल तेवढे तू सांग?हे हरी आम्ही द्वैत ठेऊन च तुला शरण आलो आहे हेच म्हणणे बरे वाटते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मूळ करण सत्ता – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.