पृथक मी सांगों किती – संत तुकाराम अभंग – 730
पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥१॥
अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥
क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥२॥
तुका म्हणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥३॥
अर्थ
मी सर्वांना धर्म आणि नीती बद्दल किती वेळा सांगू?विठ्ठलाच्या ठिकाणी सर्वांनी शुध्द भाव ठेवणे हेच धर्म आणि नीती आहे. क्षर आणि अक्षराचा भाग एक विठ्ठल आहे व तोच पंढरपूरलाच आहे,सर्वांनी तेथे जावे.तुकाराम महाराज म्हणतात सर्व मंथन केलेले वेदाचे सारभूत लोणी म्हणजे एक विठ्ठलच आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पृथक मी सांगों किती – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.