माया ब्रम्ह ऐसें म्हणती – संत तुकाराम अभंग – 73

माया ब्रम्ह ऐसें म्हणती – संत तुकाराम अभंग – 73


माया ब्रम्ह ऐसें म्हणती धर्मठक ।
आपणासरिसे लोक नागविले ॥१॥
विषयीं लंपट शिकवी कुविद्या ।
मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥
करुनी खातां पाक जिरे सुरण राई ।
करितां अतित्याई दुःख पावे ॥२॥
औषध द्यावया चाळविलें बाळा ।
दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥३॥
तरावया आधीं शोधा वेदवाणी ।
वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥४॥
तुका म्हणे जयां पिंडाचें पाळण ।
न घडे नारायण भेट तयां ॥५॥

अर्थ
समाजात काही पढतमुर्ख, धर्मपंडित माया आणि ब्रम्ह यावर बडबड करुण सामान्य लोकांची दिशाभूल करीत असतात असे बोलुन ते स्वत:ची तर फजीती करतात परंतु दुसर्‍याची दिशाभुल करुन त्यांचीही फजीती करतात .विषयलंपट इतरांना कुविद्या, अधर्म शिकवितो, त्याच्यामागे लोक फिरत असतात .सुरन आणि मोहरी शिजवुन खाल्ल्याने लाभ होतो ,तर कच्चे खल्ल्याने अपचन होते .आजारी मुलाला कडु औषध देताना आई त्याला गुळाच्या खडयाचे आमिष दाखवते .प्रपंचाच्या भवसगरातून तरुन जाण्यासाठी वेदाचे संशोधन करुन त्यातील रहस्य जाणून घ्यायला हवे, त्यातील त्रुटि काढून टाकल्या पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात, जो स्वताच्या देहाविषयी आसक्त असतो, त्याला देव भेटने कठिण आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


माया ब्रम्ह ऐसें म्हणती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.