देह नव्हे मी सरे – संत तुकाराम अभंग – 729
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥
पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥२॥
तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥३॥
अर्थ
जेव्हा मी ब्रम्ह आहे हे समजते तेंव्हा जीव विठ्ठल रूप होतो.म्हणून त्वरा करून त्याच्याच चिंतनात वेळ घालवावा.देव सर्व ठिकाणी आहे म्हणून आपल्या पाळनाची म्हणजे पालनाची चिंता नाही.तुकाराम महाराज म्हणतात आपण जर देवाला आपला जीवच अर्पण केला तर तो परमात्माच आपल्या हृदयात प्रकट होईल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देह नव्हे मी सरे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.