देवाचिये माथां घालुनियां – संत तुकाराम अभंग – 728

देवाचिये माथां घालुनियां – संत तुकाराम अभंग – 728


देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥१॥
नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥
करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥
तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥

अर्थ

देवाच्या माथ्यावर सर्व भार घालून त्यावरून आपला जीव ओवाळून टाकावा.देहाभिमानाचा छंद नाद हा खोटा आहे,तो तू दूर कर.एकसारखे तू हरी नामाचा टाहो कर दुसरे काही आडे येऊ देवू नकोस.तुकाराम महाराज म्हणतात अरे तू या लटिक्या(खोट्या)चा संग टाकून दे मग आंनद कसा प्रकट होतो ते बघ.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

देवाचिये माथां घालुनियां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.