आळी सलगी पायांपाशीं – संत तुकाराम अभंग – 726
आळी सलगी पायांपाशीं । होईल तैसी करीन ॥१॥
आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥
अवघ्या निरोपणा भाव । हाचि ठाव उरलासे ॥२॥
तुका म्हणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥३॥
अर्थ
हरी तुझ्या चरणांपाशी आम्ही आवडेल तसे हट्ट आम्ही पूर्ण करून घेऊ.तुला सोडून आम्ही दुसरे कोठे बरे जावे?तुझ्या चरणांमध्ये आमचा जीव गुंतला आहे.आमचा भाव निरुपण करण्यास तुझेच एक स्थान उरले आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तू कृपाळू आहेस तूच आमचे लाड पूर्ण करावेत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आळी सलगी पायांपाशीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.