अवघ्या उपचारा – संत तुकाराम अभंग – 725
अवघ्या उपचारा । एक मनचि दातारा ॥१॥
घ्यावी घ्यावी माझी सेवा । दिन दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥
अवघियाचा ठाव । पायांवरी जीवभाव ॥२॥
चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥३॥
अर्थ
परमार्थात हरी प्राप्ती करून घेण्यासाठी सर्व श्रेष्ठ साधन म्हणजे मन होय हे दातार मी तुला माझे हे मन अर्पण केले आहे.माझी सेवा दिन दुर्बळाची आहे ती तू गोड मानून घे.तुला सर्व काही माहित आहे तू सर्व जाणता आहे,हे हरी मी तुझ्या पायावर माझा जीवभाव अर्पण केला आहे.तुकाराम महाराज म्हणतात माझ्या चित्ताचे आसन करून मी तुझे गुणगान गात आहे तुझे कीर्तन करतो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
अवघ्या उपचारा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.