अवघ्या भूतांचें केलें – संत तुकाराम अभंग – 723

अवघ्या भूतांचें केलें – संत तुकाराम अभंग – 723


अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघीच दान दिली भूमि ॥१॥
अवघाचि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥
अवघींच तीर्थे व्रतें केले याग । अवघेंचि सांग जालें कर्म ॥२॥
अवघेचि फळ आलें आम्हां हातां । अवघेचि अनंता समर्पीलें ॥३॥
तुका म्हणे आतां बोलों अबोलणें । काया वाचा मनें उरलों नाहीं ॥४॥

अर्थ

आम्ही सर्व भूत मात्रांना अन्नाचे दान दिले आहे सर्व पृथ्वी आम्ही दान दिली आहे.सगळे दिवस व रात्र शुध्द स्वरूपाचे केला,त्याला पर्वकाळाचे स्वरूप दिले.आम्ही सर्व कर्म केले सर्व प्रकारची यथासांग कर्मे संपविले.या सर्व कर्माचे फळ आमच्या हातात आले पण आम्ही तेही फळ या हरीला समर्पण केले.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही ब्रम्‍ह ज्ञानाविषयी बोललो तरी ते ब्रम्‍हज्ञान आहे बोलण्याचाही पलीकडचे आहे आता काय,वाचा,मानाने आम्ही उरलोच नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

अवघ्या भूतांचें केलें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.