रिद्धीसिद्धी दासी कामधेनु – संत तुकाराम अभंग – 721

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु – संत तुकाराम अभंग – 721


रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥
लोडे बालिस्तें पलंग सुपत्ति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥
पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥
तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥

अर्थ

आमच्या घरी समोर रिद्धी सिद्धी दासी आहेत,काय पाहिजे ते द्यायला कामधेनु आहे,पण आमच्या मनात कसलीही अपेक्षा आसक्ती नसल्यामुळे आम्हाला धड भाकरी देखील खायला मिळत नाही.आमच्या कडे लोड,तक्के,गाड्या,पलंग व सर्व सुखसोई आहेत,पण आम्ही इच्छा रहितआहोत त्यामुळे नेसायला वस्त्र देखील नाही.आम्हाला विचारले की,आम्ही कोठे आहोत तर आमचा निवास वैकुंठात आहे परंतु,आम्हाला राहावयास कोठेही जागा नाही.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जगाचे या त्रैलोक्याचे राजे आहोत पण आम्हाला कोणाचेही उणे दुने नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.