म्हणवितां हरीदास कां रे – संत तुकाराम अभंग – 720

म्हणवितां हरीदास कां रे – संत तुकाराम अभंग – 720


म्हणवितां हरीदास कां रे नाहीं लाज । दीनासी महाराज म्हणसी हीना ॥१॥
काय ऐसें पोट न भरेसे जाले । हालविसी कुले सभेमाजी ॥२॥
तुका म्हणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥३॥

अर्थ

हे ढोंगी माणसा तू स्वतःला हरिदास म्हणवितोस संसारा ने दिन असलेल्या लोकांकडून स्वतःला महाराज म्हणवितोस असे करताना तुला लाज नाही का वाटत?त्यांच्या पद्धतीने नाचतोस.तुझे पोट भारत नाही,म्हणून तू हे करतोस काय?तुकाराम महाराज म्हणतात पोट भरण्यासाठी याने स्वतःची विटंबना करून घेतली आहे दिन होऊन तु लोकांना भिक मागत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

म्हणवितां हरीदास कां रे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.