कंठीं कृष्णमणी – संत तुकाराम अभंग – 72

कंठीं कृष्णमणी – संत तुकाराम अभंग – 72


कंठीं कृष्णमणी ।
नाहीं अशुभ ते वाणी ॥१॥
हो का नर अथवा नारी ।
रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥
नाहीं हातीं दान ।
शूरपणाचें कांकण ॥२॥
वाळियेली संतीं ।
केली बोडोनि फजिती ॥३॥
तुका म्हणे ताळा ।
नाहीं त्याची अकळा ॥४॥

अर्थ
ज्यांच्या कंठातून कृष्णनाम येत नाही ती वाणी अशुभ आहे .अशी व्यक्ति परमार्थ मार्गात अमंगळ मानली जाते .जे हात दान देण्यास पुढे होत नाही अश्या नास्तिक मनुष्यास संत जवळ करीत नाहीत, त्याला कडक शब्दात सुनावितात त्याची चांगलीच फजीती करतात . तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या आचारणामध्ये ताळमेळ नाही, त्याला अवकळा प्राप्त होते.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


कंठीं कृष्णमणी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.