आवडीच्या मतें करिती – संत तुकाराम अभंग – 719

आवडीच्या मतें करिती – संत तुकाराम अभंग – 719


आवडीच्या मतें करिती भोजना । भोग नारायणा म्हणती केला ॥१॥
अवघा देव म्हणे वेगळें तें काई । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥
लाजे कमंडलु धरितां भोपळा । आणीक थिगळा प्रावरणासी ॥२॥
शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥३॥
तुका म्हणें त्यास देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥४॥

अर्थ

ढोंगी जे साधू असतात ते त्यांच्या आवडीचे इतरांना भोजन करायला लावतात आणि म्हणतात कि, भोजनाचा भोग नारायणाने केला आहे म्हणजे नारायणानेच भोजन सेवन केले आहे.सर्वत्र हरीच आहे असे सांगून थोड्याश्या पैशासाठी एकमेकांचे डोके फोडायला पाहतात.आम्ही साधू आहोत असे सांगणारे लोक हातात कमंडलू अथवा भोपळा धरायला व थिगळ असलेले वस्त्र पांघरण्यास लाजतात.हे सर्व जग मिथ्या आहे असे वर तोंड करून हे ढोंगी लोक सांगतात,मात्र हेच लोक भरजरी कपडे,चांदीचे गडवे आणि धनाची अपेक्षा करतात.तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ढोंगी साधूंनी कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी त्यांना भगवंत प्राप्ती होत नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आवडीच्या मतें करिती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.