उष्ट्या पत्रावळी करूनियां – संत तुकाराम अभंग – 718

उष्ट्या पत्रावळी करूनियां – संत तुकाराम अभंग – 718


उष्ट्या पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥१॥
ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥२॥
तुका म्हणे एका नारायणा घ्याई । वरकडा वाहीं शोक असे ॥३॥

अर्थ

एखाद्याच्या कवितेतील चोरून शब्द गोळा करून ते सादर करून त्याचे अलंकार गोळा करून आपले कव्य आहे असे काही कवी करतात व आपला मोठेपणा सिध्द करण्याचा प्रयत्न करतात.असे हे पातकी कवी जो पर्यंत चंद्र सूर्य आहेत तो पर्यंत नरकात खितपत पडतात.तुकाराम महाराज म्हणतात एका नारायणाचे ध्यान करावे,इतर मार्गाला जर आपण लागलो तर शोक करावा लागेल हे खरे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उष्ट्या पत्रावळी करूनियां – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.