नीचपण बरवें देवा – संत तुकाराम अभंग – 717
नीचपण बरवें देवा । न चले कोणाचाही दावा ॥१॥
महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥
येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरी ॥२॥
तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥३॥
अर्थ
नीचपण म्हणजे सामान्यपण हेच बरे आहे देवा,कारण त्याच्या कडे कोणीही महत्वाने पाहत नाही किंवा त्याच्या कडे कोणी हि अपेक्षा करत नाही या कारणाने त्याचा कोणाला रागी येत नाही व त्याचे कोणी वैरही धरीत नाही.महापूर जरी आला तर त्या महापुरात मोठ मोठे झाड वाहून जातात,पण अतिशय लहान असलेले लव्हाळे तसेच राहतात कारण ते पाण्यासमोर वाकतात.समुद्रात पोहताना मोठी लाट आल्यावर जो नम्र होतो म्हणजे खाली वाकतो,त्याच्या पाठीवरून लाट जाते व त्याचे रक्षण होते.तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या बलवान व्यक्तीचे पाय जर धरले तरत्यापुढे ते बलवान व्यक्तीचे आपल्यावर मात्र काही चालत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
नीचपण बरवें देवा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.