लहानपण दे गा देवा – संत तुकाराम अभंग – 716
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ध्रु.॥
ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥२॥
तुका म्हणे जाण । व्हावें लहनाहुनि लहान ॥३॥
अर्थ
हे देवा तू मला लहान पण म्हणजे मला उच्च पद किंवा मोठेपणा ते काही देऊ नकोस.मुंगी लहान असल्यामुळे तिला साखर खायला मिळते.क्षीरसागरात निघालेला ऐरावत हा हत्ती एक थोर रत्न आहे पण त्याला देखिल अंकुशाचा मार खावा लागतो.ज्याचा अंगात मोठेपण आहे त्यांना यातना हि तेवढ्याच मोठ्या असतात.तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जाणून घेऊन आपण लहानाहुनही लहान व्हावे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
लहानपण दे गा देवा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.