धांवे त्यासी फावे – संत तुकाराम अभंग – 715

धांवे त्यासी फावे – संत तुकाराम अभंग – 715


धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥१॥
घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥
धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥२॥
तुका म्हणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥३॥

अर्थ

सर्व द्वैत जाणून जो हरी कडे धाव घेतो तोच मोक्षाचा अधिकारी.आपल्या अंतःकरणरुपी घर देवाच्या प्रेमाने परिपूर्ण भरावे,म्हणजे जन्म मरणाची चिंता येर झाराची चिंताच राहणार नाही. प्रेमानेच जगाच्या मालकाला पुंडलीकाने याठिकाणी विटेवर उभे केले आहे.तुकाराम महाराज म्हणतात असा उमटला आहे कि तो संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

धांवे त्यासी फावे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.