येई गा विठ्ठला येई गा – संत तुकाराम अभंग – 712

येई गा विठ्ठला येई गा – संत तुकाराम अभंग – 712


येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥
पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥
तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥

अर्थ

हे विठ्ठला तू लवकर ये लवकर ये,तुला आळवताना माझा हा प्राण फुटू पाहत आहे म्हणजे प्राण शरीरातून निघू पाहत आहे.मी मोठ्या संसाररूपी अरण्यात पडलो आहे,तू लवकर ये अजून का उशीर तू लावतोस.तुला या लौकिकाची शंका येत नाही का, आपल्या बालकाला सोडून देताना?तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आम्हाला तुझ्या पासून फार दूर ठेवले आहे यांची खंत आम्हाला वाटत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

येई गा विठ्ठला येई गा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.