संसार तो कोण लेखे – संत तुकाराम अभंग – 711
संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरीजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥
स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥
अर्थ
आम्हांला हरिजना सारखे सखे आहेत,म्हणून संसाराकडे कोण लक्ष देतो?आमचा संपूर्ण काळ हा ब्रम्हानंदात जात आहे,त्यामुळे आमच्या हृदयात हरी भक्तीची आवड पूर्ण पणे भरली आहे.स्वप्नातही आम्हाला कसल्याही प्रकारची चिंता नाही.रात्रंदिवस आम्ही सुखी समाधानी आहो.तुकाराम महाराज म्हणतात या हरी भक्तांच्या संगतीने आम्हाला ब्रम्हा रसाचे भोजन दररोज मिळत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संसार तो कोण लेखे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.