बोलिलेचि बोलें पडपडताळूनि – संत तुकाराम अभंग – 709
बोलिलेचि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥१॥
बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥
बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥२॥
तुका म्हणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां ॥३॥
अर्थ
देवाविषयी आत्तापर्यंत मी जे काही बोल बोललो आहे जे काही सांगितले आहे, ते बोल पडताळून पाहिले आता माझ्या मनात कोणतीच शंका राहिली नाही.हे भगवंता तू अनेकांची माय म्हणजे आई आहेस तू कृपाळू आहेस भक्तांच्या मागण्याची कटकट सहन करून तू त्याची आस पुरवितो.तू बहुतांच्या मनातील जाणून त्यांचा भाव जाणून त्यांना तू मोक्ष देतोस.आणि त्यांच्या संगे तू कवतुकाने खेळतोस.तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तुझे हे वर्म ठाऊक आहे,त्यासाठी आम्ही पाहिजे ते श्रम घेऊ आम्हला माहित आहे कि ते श्रम वाया जाणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
बोलिलेचि बोलें पडपडताळूनि – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.