आम्हांपाशीं याचें बळ – संत तुकाराम अभंग – 708
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥
धरूनि ठेलों जीवेंसाठी । होय भेटी तोंवरी ॥ध्रु.॥
लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥२॥
तुका म्हणे अवकाश । तुमच्या ऐसें व्हावया ॥३॥
अर्थ
देवाचे बळ आमच्यापाशी किती काळ चालणार आहे?जोपर्यंत देवाची आणि आमची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला आमच्या हृदयात भरून ठेवू.गाठ झाल्या शिवाय आम्ही याची पाठ सोडणार नाहीत तोवर आम्ही देवाच्या मागे फिरणार.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या सारखे होण्यास आजून काही काळ बाकी आहे.त्यानंतर आपले ऐक्य होईलच.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आम्हांपाशीं याचें बळ – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.