आह्मीं याची केली सांडी – संत तुकाराम अभंग – 707
आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥१॥
आहे तैसा असो आतां । चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥
बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांपाशीं । धीराऐसी जतन ॥३॥
अर्थ
तू आमच्या कडे लक्ष देत नाहीस त्यामुळे आम्ही तुझ्याशी संबंध तोडले आहे कुठे तुझ्या तोंडी लागावे?आता देव आहे तसा असेल त्याच्या विषयी चिंता केल्याने चिंता वाढत जाईल त्यामुळे चिंता करणे सोडून दिले आहे.आम्ही जे काही देवाला बोलतो त्याचा त्रास होतो,त्यामुळे आपण दोघांनी भिन्न भिन्न राहावे हे बरे आहे.तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तू आमच्याशी कसाही वागलास तरी आम्ही तुझी भक्ती सोडणार नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आह्मीं याची केली सांडी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.