आहे तेंचि आम्ही मागों – संत तुकाराम अभंग – 706
आहे तेंचि आम्ही मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्ट ॥१॥
न बोलावीं तेची वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥
एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुम्हां गोपाळा नाहीं ऐसा ॥२॥
तुका म्हणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तो ॥३॥
अर्थ
हे देवा तुझ्या जवळ जे आहे तेच तर आम्ही मागत आहोत,तरी तू देत नाहीस असा तू क्रियानष्ट होऊ नकोस.तुझ्यावर आम्ही प्रेम करून देखील तू आम्हाला भेटत नाहीस हे वर्म आम्हाला सांगणे बरे दिसत नाही.तुझे हे गुण आम्ही कसे प्रकट करू?आज पर्यंत तुम्ही एका भक्ताचा उद्धार केला मग आता हे गोपाळा तुम्ही दुसऱ्या एका भक्ताचाअव्हेर का?तुकाराम महाराज म्हणतात आजून पर्यंत लोकांना तुझे हे र्दुगुण कळून आले नाहीत त्यामुळे आपल्या ब्रीदाचे रक्षण तू करून घे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आहे तेंचि आम्ही मागों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.