तुमची तो भेटी नव्हे – संत तुकाराम अभंग – 705

तुमची तो भेटी नव्हे – संत तुकाराम अभंग – 705


तुमची तो भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडेच बोली ब्रम्हज्ञान ॥१॥
आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥
तुम्हां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥२॥
तुका म्हणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाचीच होती ॥३॥

अर्थ

हे हरी तुमची मला अजून भेट झाली नाही त्यामुळे मला असे वाटते कि माझ्या मुखातून जे ब्रम्हज्ञानाचे बोल येतात ते अजून कोरडेच आहे.आता मला असे वाटते की,कोणाही संगे न बोलावे व कोणाच्या संपर्कात फार रहू नये.देवा मी ब्रम्‍हज्ञान सांगतो म्हणून तुम्ही असे ठरवले आहे कि काय कि आता तुला दर्शन द्यायची गरज राहिली नाही हे निमित्त साधून माझ्याबरोबर संगच करायचा नाही असेच असे तुम्ही ठरविले आहे काय?तुकाराम महाराज म्हणतात आता मला एकच वासना आहे ती तुम्ही पूर्ण करा,ती वासना म्हणजे तुमच्या दर्शनाची आवड मला आहे ते दर्शन तुम्ही मला द्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

तुमची तो भेटी नव्हे – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.