मोल देऊनियां सांठवावे – संत तुकाराम अभंग – 702
मोल देऊनियां सांठवावे दोष । नटाचे ते वेष पाहोनियां ॥१॥
हरीदासां मुखें हरीकथाकीर्तन । तेथें पुण्या पुण्य विशेषता ॥ध्रु.॥
हरीतील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥२॥
तुका म्हणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभक्तीहीन रसीं गोडी ॥३॥
अर्थ
नाटकातील वेष धरण करणार्यांचे तोंड पाहणे म्हणजे मोल म्हणजे, धन देऊन दोष साठवणे.हरिदासाच्या मुखाने देवाचे चिंतन ऐकणे तेच विशेष पुण्य आहे.नाटकातील लोक हरीचे व गोपिकांचे वेश घेऊ वस्त्र हरणाचे खेळ खेळतात त्यांना तर मोठेच पाप लागते.तुकाराम महाराज म्हणतात असे हे लोक आहेत यांच्या अंगी भक्ती नाही परमार्थाविषयी गोडी नाही देवाची सेवा करण्याचे यांच्या मनात येत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मोल देऊनियां सांठवावे – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.