माझा पाहा अनुभव – संत तुकाराम अभंग – 701

माझा पाहा अनुभव – संत तुकाराम अभंग – 701


माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
बोलविलें तेंचि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥
सोडिलिया जग निंद । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥

अर्थ

माझा अनुभव तुम्ही पहा,मी देव आपला केला आहे.मी ज्यावेळी देवाला बोलतो त्यावेळी तो लगेच माझ्यापुढे येतो.जग निंदा सोडून दिले म्हणजे गोविंद आपण म्हणेल ते करतो.तुकाराम महाराज म्हणतात मी धैर्‍याने भक्ती करतो म्हणून देव माझ्या मध्ये गुंतला आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझा पाहा अनुभव – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.