पाववावें ठाया – संत तुकाराम अभंग – 700
पाववावें ठाया । असें सवें बोलों तया ॥१॥
भावा ऐसी क्रिया राखे । खोटया खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥
न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥२॥
तुका म्हणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥३॥
अर्थ
आम्हाला तू आमच्या ठिकाणी पोहोचव असे आपण देवाला म्हणूया.ज्याचा जसा भक्तिभाव देव विषय असेल तसा देव त्याच्याशी वर्तन करत असतो जो खोटेपणाने दिवशी वागतो त्याचा खोटेपणा मुळे त्याच्यापुढे दुःख होते.म्हणून आम्ही देवाशी काही अंतर न ठेवता काहीच भेद आम्ही ठेवणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचे हे जीवा भावाचे सत्य वागणे देवाला मानवते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पाववावें ठाया – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.