गेली वीरसरी – संत तुकाराम अभंग – 70
गेली वीरसरी ।
मग त्यासि रांड मारी ॥१॥
मग नये तैसी सत्ता ।
गेली मागील आणितां ॥ध्रु.॥
भंगलिया चित्ता ।
न ये काशानें सांदितां ॥२॥
तुका म्हणे धीर ।
भंगलिया पाठीं कीर ॥३॥
अर्थ
एखाद्या मनुष्याच्या स्वभावातील वीरत्व गेले तर त्याला कोणीही मान देत नाही एखादी क्षुद्र स्त्रीसुद्धा त्याला मारते .एकदयाची जगात नाचक्की झाली तर पुन्हा त्याला समाजात कोणत्याही प्रकारचा मान सन्मान मिळत नाही .एखादी व्यक्ती मना मधुन उतरली म्हणजे पुन्हा चित्तामधे ती बसत नाही .तुकाराम महाराज म्हणतात, की एखाद्या मनुष्याने आत्मविश्वास जर गमवला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्कारावि लागते .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
गेली वीरसरी – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.