सुखे वोळंब दावी गोहा – संत तुकाराम अभंग – ७
सुखे वोळंब दावी गोहा ।
माझें दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा ।
होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
अखंड मज पोटाची व्यथा ।
दुधभात साकर तूप पथ्या ॥२॥
दो पाहरा मज लहरी येती ।
शुद्ध नाहीं पडे सुपती ॥३॥
नीज नये घाली फुलें ।
जवळीं न साहती मुलें ॥४॥
अंगी चंदन लावितें भाळीं ।
सदा शूळ माझे कपाळीं ॥५॥
निपट मज न चले अन्न ।
पायली गहूं सांजा तीन ॥६॥
गेले वारीं तुम्हीं आणिली साकर ।
साता दिवस गेली साडेदहा शेर ॥७॥
हाड गळोनि आलें मास ।
माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला ।
मेलियावरी नरका नेला ॥९॥
अर्थ
एक भोगवादी स्त्री हि नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काही दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेडा झाल्या मुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो.ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पोटाची व्यथा आहे त्यामुळे त्याला पथ्य म्हणजे दुध तूप साखर घालून भात खावा लागेल.आहो मला दुसऱ्या प्रहराला चक्कर येते आणि मी बेशुध्द पडते मला शुध्द राहत नाहीव त्या मुळे मला झोप लागत नाही.मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व हि माझी मुले माझ्या जवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही.नाटक करत ती त्याला म्हणते कि मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते.साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो.गेल्या आठवड्या मध्ये तुम्ही जी साडे दहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली.आहो माझे हाडे बारीक होऊन माझे मांस वाढले केव्हढे माझे हे दुख आहे हे तुम्हाला कळत कसे नाही?तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारे त्या माणसाचा जिवंत पणे गाढव केला आणि मेल्यावर तो नरकाला गेला.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सुखे वोळंब दावी गोहा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.