मज अंगाच्या अनुभवें – संत तुकाराम अभंग – 699
मज अंगाच्या अनुभवें । काही वाईट बरें ठावें ॥१॥
जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥
वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥२॥
तुका म्हणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥३॥
अर्थ
मला माझ्या स्वतःच्या अनुभवाने काय बरे आणि काय वाईट हे समजले आहे.या गोष्टींपासून मी वेगळाच राहणार आहे कारण मागे झालेले आणि पुढे काय होणार या विचाराचा मनावर काहीच परिणाम होत नाही.हे जग ओस आहे हे माहित असून देखील त्याच्याकडे पुन्हा जाणे म्हणजे एक प्रकारचे दुखणेच ओढुन घेतल्यासारखे आहे.तुकाराम महाराज म्हणतात म्हणून आपण देवालाही आपल्या बरोबर घेऊन जाऊ म्हणजे तो आपल्याला योग्य ठिकाणी पाहोचविल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मज अंगाच्या अनुभवें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.