मुदल जतन झालें – संत तुकाराम अभंग – 698
मुदल जतन झालें । मग लाभाचें काय आलें ॥१॥
घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥
घाला पडे थोडेंच वाटे । काम मैंदाचें चपेटे ॥२॥
तुका म्हणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥३॥
अर्थ
आपली मुदल जर जतन झाली तर मग लाभ होणे सहज शक्य आहे.हृदयमंदिरात भक्ती भाव हा ठेव आहे त्याला गाठ मारून ठेवा.त्याचे तुम्ही रक्षण करा त्याला मिठी मारून ठेवा.कामरूपी मैंद शत्रूचा घाला पडेल,त्या पासून तुम्ही सावध राहा.तुकाराम महाराज म्हणतात अंतरात कपटपणा ठेऊन बाहेर दंभ मिरविणे खोटे आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
मुदल जतन झालें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.