ऐसे कुळीं पुत्र होती – संत तुकाराम अभंग – 696

ऐसे कुळीं पुत्र होती – संत तुकाराम अभंग – 696


ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥१॥
चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥
त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥२॥
तुका म्हणे ग्रामपशु । केला नाशु अयुष्या ॥३॥

अर्थ

काही कुळात असे काही पुत्र जन्माला येतात कि,ते त्यांच्या पूर्वजांना बुडवितात म्हणजे अधोगतीला नेतात.या पुत्रांच्या भाग्याच्या वाट्यात चाहाडी तसेच चोरी करणे हेच त्यांचे भांडवल असते.यांच्या योगाने पृथ्वी दुखी होते,त्यांचा भार तिला पृथ्वीला सहन होत नाही.तुकाराम महाराज म्हणतात असे हे पापी कुत्र्या प्रमाणे असतात,ते स्वतः आपल्या आयुष्याचा नाश करून घेतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

ऐसे कुळीं पुत्र होती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.