हरी हरी तुह्मीं म्हणा – संत तुकाराम अभंग – 694

हरी हरी तुह्मीं म्हणा – संत तुकाराम अभंग – 694


हरी हरी तुह्मीं म्हणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटईल ॥१॥
आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥
भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । म्हणावा पतित वेळोवेळां ॥२॥
तुका म्हणे हा तंव कृपेचा सागर । नामासाठी पार पाववील ॥३॥

अर्थ

तुम्ही सकळ जणांनी हरी हरी म्हणा,त्यामुळे तुमच्या मायाजाळाचा नाश होईल अन्य साधनांच्या भरीस तुम्ही पडू नका त्याने तुमचीच फसगत होईल.भक्ती भवाने तुलसीचे पान आणि जल म्हणजे पाणी हे श्रीहरीला अर्पण करा व मी पतित आहे असे वेळोवेळ म्हणून त्या हरी पुढे हात जोडा.तुकाराम महाराज म्हणतात तो हरी हा फार कृपाळू आहे.तो नामासाठी आपल्याला भवसागरातून पार करेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

हरी हरी तुह्मीं म्हणा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.