जो मानी तो देईल – संत तुकाराम अभंग – 686

जो मानी तो देईल – संत तुकाराम अभंग – 686


जो मानी तो देईल काई । न मानी तो नेईल काई ॥१॥
आम्हां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥
आधीन तें जना काई । जल्पें वांयांविण ठायीं ॥२॥
वंदी निंदी तुज तो गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥

अर्थ

या जगात जो आम्हाला मान देतो तो आम्हाला काय देणार आणि जो आम्हाला मानीत नाही तो आमचे काय नेणार आमच्या साठी सर्व भूती तो विठ्ठल आहे.वाटेल तर तो आमच्या चित्ती राहो.आपल्या जवळ काही नसताना लोक आपल्या ठिकाणी अभिमान बाळगत असतात.तुकाराम महाराज म्हणतात कोणी आम्हाला वंदन केले काय किंवा कोणी आमची निंदा केली काय ते सर्व तुलाच कडे लागते विठ्ठला.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जो मानी तो देईल – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.