विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं – संत तुकाराम अभंग – 684

विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं – संत तुकाराम अभंग – 684


विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृति स्वप्नीसुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलाविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥
तुका म्हणे ते ही विठ्ठलचि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥

अर्थ

ज्याचा गीतात विठ्ठल आहे,ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे,ज्याच्या विश्रांती मध्ये विठ्ठल,भोगा मध्ये विठ्ठल आहे,ज्याच्या आसनामध्ये विठ्ठल शायानामध्ये विठ्ठल,ज्याच्या भोजनामध्ये व प्रेत्येक घसा ला विठ्ठल आहे,जागेपणात,झोपेत स्वप्नात अर्धवट झोपेत विठ्ठल आहे विठ्ठला शिवाय दुसरे काहीच दिसत नाही,ज्याचे सर्व अलंकार हे विठ्ठलच आहे,ज्याचा सर्व निर्धार हा विठ्ठलच आहे,तुकाराम महाराज म्हणतात तेच लोक विठ्ठल झाले,त्यांचे संकल्प विकल्प हे विठ्ठल रूपच होऊन जातात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.