येगा येगा पांडुरंगा – संत तुकाराम अभंग – 680

येगा येगा पांडुरंगा – संत तुकाराम अभंग – 680


येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥
तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥४॥

अर्थ

हे पांडुरंगा तू लगेच धावत ये,आणि मला उचलून आपल्या पदरात घे.तुझा आश्रय मला आहे तरी मी मला मी परदेशी असल्या सारखे वाटत आहे.हे प्रभू मला या भवसागरातून सोडून मुक्त कर.तुला कोणी आडे म्हणजे विरोध करेल असा कोणी नाही.तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंगा माझ्या कडे येण्यासाठी तू का विलंब करत आहेस?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

येगा येगा पांडुरंगा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.