भोगें घडे त्याग – संत तुकाराम अभंग – 68

भोगें घडे त्याग – संत तुकाराम अभंग – 68


भोगें घडे त्याग ।
त्यागें अंगा येती भोग ॥१॥
ऐसें उफराटें वर्म ।
धर्मा अंगींच अधर्म ॥ध्रु.॥
देव अंतरे तें पाप ।
खोटे उगवा संकल्प ॥२॥
तुका म्हणे भीड खोटी ।
लाभ विचाराचे पोटीं ॥३॥

अर्थ:-

विवेकरुपी बुध्दी ठेउन प्रपंच्यातील विषयभोग भोगले त्याचे तर त्याचे त्यागत रूपांतर होते, पण अविचाराने भोगाचा त्याग केला तर तो सफल होत नाही . खरे तर हे ऊफराटेच दिसते भेगाचा त्याग करणे हा धर्म आहे तरीही कधी कधी अधर्मच होतो आणि भोग भोगल्याने धर्म होतो. धर्मामधेच अधर्म लपलेला असतो .ज्या कर्मामुळे परमेश्वर व् भक्त यांच्यामध्दे द्वैतभाव निर्माण होतो, ती सर्व पापकर्मे ठरतात .तुकाराम महाराज म्हणतात, शुध्द अतःकरणाने भिडेचा(कोणाच्‍याही भिडे पोटी) सर्व त्याग करावा म्हणजे जीवनातील सर्व लाभ मिळून जीवन सार्थक होते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


भोगें घडे त्याग – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.