शीतळ साउली आमुची – संत तुकाराम अभंग – 677
शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥
जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागेलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥
कृपा तनु माझी सांभाळी दुभोनि । अमृतसंजीवनी लोटलीसे ॥२॥
आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥३॥
सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आसे ॥४॥
तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाईचें ॥५॥
अर्थ
विठाबाई माऊली हि आमुची शीतल साउली आहे,कायम प्रेमाचा पान्हा आम्हाला पाजते.तीच्या कुशीत जाऊन मी माझ्या इच्छेला येईन तोपर्यंत तीचा कृपारूपी प्रेमपान्हा पीत राहीन.हि विठाबाई माऊली आपल्या कृपेने माझा सांभाळ करीन.तिच्या मुळे अमृताची संजीवनी लोटली आहे.माझ्या आनंदाला ठाव राहिला नाही त्याला सागराची काय उपमा द्यावा?मी जर सैर वैर चललो तर माझ्या विठाबाईलाच संकट पडते.माझ्या मागे पुढे राहून ती माझे रक्षण करते.तुकाराम महाराज म्हणतात मला चिंता कशी असते हे माहित नाही.मी या विठाबाईचे लडिवाळ लाडके तान्हे बाळ आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
शीतळ साउली आमुची – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.
View Comments
तिसरे चरण असे आहे
आनंदाचा ठाव झाला माझे चित्तीं ।
सागर तो किती उपमेसी ॥३॥
आनंदाचा ठाव नाही माझे चित्ती ।
अस महाराज कसे म्हणतील ?