भूत भविष्य कळों – संत तुकाराम अभंग – 674
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥१॥
आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धेंचि ॥ध्रु.॥
जगरूढीसाठी घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥२॥
तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धीसिद्धी ॥३॥
अर्थ
भूत,भविष्य व वर्तमान ज्याला कळावे असे वाटते तो तर भाग्यहीन आहे.आम्ही विष्णू दासांनी सदैव देवाचे स्मरण करावे,प्रारब्धाप्रमाणे भोग भोगावे.ज्ञानी भविष्याचे ज्ञान असणार्या लोकांनी त्यांना पैसे मिळावेत म्हणून दुकान थाटून बसेल असतात.त्यांना नारायण भेटत नाही उलट तो त्याला त्रास देतो.तुकाराम महाराज म्हणतात आधीच हा प्रपंच अवघड आहे अशा परस्थितीत रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्यास पिडा वाढतच जात असते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
भूत भविष्य कळों – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.