जन देव तरी पायाचि – संत तुकाराम अभंग – 673

जन देव तरी पायाचि – संत तुकाराम अभंग – 673


जन देव तरी पायाचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥१॥
अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोन नेतां नये ॥२॥
तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥३॥

अर्थ

सर्व लोक देवाचे स्वरूप आहे,त्यांच्या पाया पडावे.त्यांचे दोष लक्षात ठेऊ नये.अग्नीचे कार्य हे थंडी कमी करणे आहे,पण मग अग्नीला पदरात बांधून नेता येत नाही.तुकाराम महाराज म्हणतात विंचू व सर्प हि नारायणाचीच रूपे आहेत पण त्यांच्या स्पर्श न करता त्यांना दुरून नमस्कार करावा.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

जन देव तरी पायाचि – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.