पुनीत केलें विष्णुदासीं – संत तुकाराम अभंग – 672
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥
कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥२॥
तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥३॥
अर्थ
या विष्णुदासांनी आपल्या संगतीने दोषी पातकी असलेल्या लोकांना पवित्र केले.त्या वीर विठ्ठल भक्तांकडे कोण वाकड्या नजरेने पाहीन ते विठ्ठलाचे प्रेम भरलेले शूर वीर आहेत.त्यांच्या पुढे काही अशुभ जरी आणून ठेवले तरी ते शुभ होऊन त्यांच्या पुढे येऊन उभे राहते.त्या विष्णूदासंकडे प्रेम सुखाच्या राशी असतात त्यामुळे त्यांच्या कडे पाप औषधाल देखील मिळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात या हरी दासाने नामघोषाने सारी पृथ्वी वैकुंठ मय केली आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पुनीत केलें विष्णुदासीं – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.