आह्मीं पतितांनीं घालावें – संत तुकाराम अभंग – 669

आह्मीं पतितांनीं घालावें – संत तुकाराम अभंग – 669


आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुम्हां लागे कोडें उगवणें ॥१॥
आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुम्हां हातीं ॥ध्रु.॥
न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥२॥
दयासिंधु नाम पतितपावन । हें आम्हां वचन सांपडलें ॥३॥
तुका म्हणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूंम्ही देवा ॥४॥

अर्थ

आम्ही पतीतांनी पातके करावे आणि तुम्ही पतितपावन आहात आणि आम्हाला तुम्ही संकटातून मुक्त करावे.आम्ही मर्‍यादा न ठेवता पापे वाढवितो,आणि तू त्यातून मुक्त करतोस.कधीही काहीच अपेक्षा न करता संकटात तू भक्तांचे रक्षण करतोस.तू दयासिंधु आहेस,पतितांना पावन करणारा आहेस हिच वचने आम्हाला अनेक ग्रंथातून सापडली आहेत.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही कितीही अन्याय केले तरी तू कृपावंत आहेस आमचे दोष तू पोटात घेतोस.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आह्मीं पतितांनीं घालावें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.