काम क्रोध माझे जीताती – संत तुकाराम अभंग – 665

काम क्रोध माझे जीताती – संत तुकाराम अभंग – 665


काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥१॥
कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥
पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध झालें ॥२॥
तुका म्हणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥३॥

अर्थ

काम क्रोध हे माझ्या शरीरात भरलेले आहे पण मी मात्र वरवर कोवळे (मृदू)बोलतो.मी असा असून सुद्धा तुमच्या पायाशी बसण्याची परवानगी मला कशी मिळाली,हे माझे मलाच कळत नाही. संतानी पुराणातील अनुभव देवून चित्त शुद्ध कशा प्रकारे असले पाहिजे हे सांगितले आहे परंतु माझे चित्त अजून शुद्ध झाले नाही.तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्धी कशी असते हे मला अनुभवाद्वारे दाखून द्या.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काम क्रोध माझे जीताती – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.