गाढवाचे अंगीं चंदनाची – संत तुकाराम अभंग – 662
गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राखेसवे भेटी केली तेणें ॥१॥
सहज गुण जयाचीये देहीं । पालट तो कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥
माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी थुंकोनि टाकी ॥२॥
तुका म्हणे खळा नावडे हित । अविद्या वाढवीत आपुलें मतें ॥३॥
अर्थ
गाढवाला जरी चंदनाची उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणार.त्या प्रमाणे ज्याचा स्वभावी गुण जसा असेल तसा तो सहज बदलू शकत नाही.माकडाच्या गळ्याला जर मौल्यवान मनी बांधला तरी तो चावून थुंकोन टाकणारच.तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे वाईट माणसाला आपले हित कळत नाही,तो आपल्या मताने अज्ञान वाढवीत असतो.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
गाढवाचे अंगीं चंदनाची – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.