समर्थाचें बाळ केविलवाणें – संत तुकाराम अभंग – 661
समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
अर्थ
एखाद्या श्रीमंताचे मुल जर केविलवाणे दिसले,तर लोक कोणाला हसतील राजाला हसतील की मुलाला.ते मुल ओंगळ असले,तरी त्याचा पिता प्रेमाने सांभाळ करतो.तुकाराम महाराज म्हणतात तसाच मी पतित असलो,तरी तुझ्याच नावाचा शिक्का धरण करून तुझाच झालो आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
समर्थाचें बाळ केविलवाणें – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.