चोरटें काचे निघाले चोरी – संत तुकाराम अभंग – 660
चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥
नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥
बुद्धीहीन नये कांहींचि कारणा । तयासवें जाणा तेंचि सुख ॥२॥
तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी ते कर्म वोढवलें ॥३॥
अर्थ
एक साधा चोर चोरी करण्यास निघाला,तो स्वतःच्या घरात जसा वावरतो तसे दुसऱ्याच्या घरी वावरू लागला.त्यामुळे त्या घराचा मालक जागा झाला.त्यामुळे चोराचा काहीही फायदा झाला नाही.उलट मालकाने कान,हात,पाय काढून त्याची फजिती केली.त्याप्रमाणे अज्ञानी माणसाच्या सान्निध्यात राहून काही सुख मिळत नाही.तुकाराम महाराज म्हणतात ज्याला आपल्या कामातील वर्म समजत नाही,त्याला त्याचे कर्म फार दुखः कारक होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चोरटें काचे निघाले चोरी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.