संसारच्यातापें तापलों मी देवा – संत तुकाराम अभंग – 66

संसारच्यातापें तापलों मी देवा – संत तुकाराम अभंग – 66


संसारच्यातापें तापलों मी देवा ।
करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय ।
ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
बहुतां जन्मींचा झालों भारवाही ।
सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥
वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं ।
कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पांगविलों बहु नागविलों ।
बहु दिस झालों कासाविस ॥४॥
तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं ।
ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥५॥

अर्थ
कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रपंचिक त्रासाने त्रासुन गेलो आहे .म्हणून मी तुझे चिंतन करत आहे, हे पांडुरंगा, मला भेटायला ये .अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुटण्याचा उपाय माला सापडत नाही .कामक्रोधादिक षडरीपुंनी मला चहुबाजूंनी वेढले आहे, माझी दया कुणालाच येत नाही .त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे, सर्वांनी मला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे .तुकाराम महाराज म्हणतात, हे दिनानाथ, आता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याति आहे, तेव्हा तूच अता माझे रक्षण कर .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


संसारच्यातापें तापलों मी देवा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.