तुमचिये दासींचा दास – संत तुकाराम अभंग – 659

तुमचिये दासींचा दास – संत तुकाराम अभंग – 659


तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें । उत्तरेन खरें भवनदी ॥३॥

अर्थ

हे संतजन हो तुमच्या दासांचाही दास मला करा.हाच आशीर्वाद माल द्यावा.नवविधा भक्तीचे जे वर्णन आहे जी बोलली जाते ती भक्ती तुम्ही माझ्या कडून करून घ्यावी.तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायाच्या आधारे मी भवनदी सहज तरुन जाईल


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

तुमचिये दासींचा दास – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.