मुनि मुक्त झाले भेणें – संत तुकाराम अभंग – 657

मुनि मुक्त झाले भेणें – संत तुकाराम अभंग – 657


मुनि मुक्त झाले भेणें गर्भवासा । आम्हां विष्णुदासां सुलभ तो ॥१॥
अवघाचि संसार केला ब्रम्हरूप । विठ्ठलस्वरूप म्हणोनियां ॥ध्रु.॥
पुराणीं उपदेश साधन उद्भट । आम्हां सोपी वाट वैकुंठाची ॥२॥
तुका म्हणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥३॥

अर्थ

मुनी ऋषी हे गर्भावासाच्या भेणे मुक्ती मार्गाला लागले,परंतु आम्हा विषाणू दासांना हा गर्भवास अतिशय सोपा आहे.आमचा सर्व संसार हा ब्रम्हरूप झाल आहे,म्हणून आमचे पूर्ण जीवन विठ्ठल रूप होऊन गेले आहे.पुराणात वैकुंठ प्राप्तीच्या अवघड साधना सांगितल्या आहे.मात्र आम्हाला वैकुंठाची वाट अतिशय सोपी झाली आहे.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सर्व लोकांसहित ईश्वराच्या प्रेमाचा आंनद अखंड पणे अनुभवत राहू.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

मुनि मुक्त झाले भेणें – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.