माझें आराधन – संत तुकाराम अभंग – 654

माझें आराधन – संत तुकाराम अभंग – 654


माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥१॥
तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥
दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥२॥
तुका म्हणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥३॥

अर्थ

माझे आराध्य द्वैवत हे पंढरपूरचा विठ्ठल हाच आहे.त्या एक पंढरीराया वाचून आम्ही दुसरे काहीच जाणत नाही.मी विठ्ठलाचा दास आहे,त्याच्या ठिकाणी मी अंकित आहे.तुकाराम महाराज म्हणतात आता काही झाले तरी माझ्या बुद्धीत कोणताही अथवा कुठलाही पालट होणार नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझें आराधन – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.