जींवीचा जिव्हाळा – संत तुकाराम अभंग – 652
जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥१॥
आम्हां विठ्ठल एक देव । येर अवघेचि वाव ॥ध्रु.॥
पुंडलिकाचे पाठीं । उभा हात ठेवुनि कटी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं । वाहूं रखुमाईचा पती ॥३॥
अर्थ
जीवाच्या जिव्हाळ्याला आम्ही डोळ्याने पाहू.आम्हांल विठ्ठल हा एकच देव आहे बाकी सर्व व्यर्थ आहे.तो पुंडलिकाच्या पाठीशी कटेवर हात ठेऊन उभा आहे. तुकाराम महाराज म्हणतात रखुमाईचा पती विठ्ठल आम्ही आमच्या चित्ता मध्ये धरून राहू.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
जींवीचा जिव्हाळा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.